कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

राधाकृष्ण रुप..

राधा-कृष्ण रुप


ही भारताची भूमी
संस्कारज्योती तेजाची
कृष्ण बालकांत वसतो
अन् बालिका रुपे राधेची

कृष्ण राधा म्हणजे केवळ
नव्हतीच व्यक्तीविशेष
त्या स्थिती असती मनाच्या
मोहमाया त्यागून जे शेष

प्रेम भक्तीच्या संगमी
न्हात जावे या सुगंधात
हाच ध्यास घेत श्वास
आत्मचेतना  होई जागृत

जीवनाचे लक्ष्य सर्वदा जर
नयनदर्पणी लख्ख असेल
 आत्मप्रेरणा चेतवील प्रज्ञा
गुरु ठायीठायी मिळतील

जीवन होईल एक शाळा
निसर्ग पुस्तक अभ्यासूया
द्वापरातील राधामोहनाचे
रुप कलियुगात साकारुया...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
२३.०८.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: