बालमित्रांसाठी
काव्यमय कोडे...
मी आहे कोण?
सांगा की हो जरा
विचार करा थोडा
पण करा त्वरा..
तीन रुपांत वावरतो
जीवाला मी जगवतो
जीवन माझे नाव दुजे
नद्या सागरी मी राहतो...
स्वच्छतेसाठीही मीच लागतो
शरीरात विविधरुपी वाहतो
महीवरुन आकाशी जातो
तिलाच मग न्हाऊ घालतो...
शेती असो वा स्वयंपाक.. सारे
माझ्या वाचून कोण करतो...!
हायड्रोजन नि ऑक्सिजनच्या
संयोगातून मी हो बनतो...
आग लागली कोठे जरीही
चुटकीसरशी जातो विझवूनी
सृष्टीच्या उपकाराखातर
घ्या ना माझे मोल जाणुनी...
विनवतो छोट्या दोस्तांनो तुम्हा
वाचवा मला, संकटात मी
संकटास भारी थांबवाणारे
भविष्यवेधी केवळ हात तुम्ही...
खाजवा की डोकं थोडं
सांगा पाहू कोण मी?
एक नाही दोन नाही
पाच मिळतील पेढे बदामी...!
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता.गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा