उज्ज्वलाची लाली
व्यथा संसाराची
ऐकावी साऱ्यांनी
दारुपायी 'दारा'
'पोरं' दीनवाणी... १
कुसंगाची माया
पथ चुकलेले
नशेत झिंगता
चित्र बदलले... २
बेफाम धुंदीत
मस्त होई बाप
मायेला असह्य
रोजचाच ताप...३
कष्ट उपसे ती
पाषाण बांधूनी
खांदी भार वाहे
संसार तारिणी... ४
तिच्या पाठी रोज
बसताना चोप
असहाय्य पिल्ले
ऊरी थरकाप... ५
बिघडली साऱ्या
गावाची कहाणी
फक्त दारुबंदी
ध्यास होता मनी...६
आयाबायांचा गं
मेळाच जमला
दारुबंदीसाठी
पदर खोचला...७
रौद्र त्या रूपांत
दिसे दुर्गा काली
भावी भारताला
उज्ज्वलाची लाली...८
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि ३.१०.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा