कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

पुन्हा एकदा लहान व्हावे...

 पुन्हा एकदा....... 

खूप लहान व्हावे
आनंदात न्हावे
स्वच्छंदी जगावे
       पुन्हा एकदा.     1

आईच्या कुशीत झोपावे
बाबांना घोडा बनवावे
दादाला चिडवावे
        पुन्हा एकदा.    2

फुलांशी बोलावे
पाखरांसह गावे
फुलपाखरांवर भाळावे
        पुन्हा एकदा.    3

रानात हिंडावे
चिंचा बोरं खावे
मोरासंगे नाचावे
      पुन्हा एकदा.    4

दोस्त जमवावे
जीवास जीव द्यावे
निरागस व्हावे
       पुन्हा एकदा.  5

रचना 
शिल्पा म.वाघमारे 
स.शि मालेगाव खुर्द 
ता गेवराई जि बीड 
12.08.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: