कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

तू ही थोडं प्रेम कर



तुही थोडं प्रेम कर
तुही थोडं प्रेम कर
तुझ्या बंधुसख्यांवर
चराचर तरुवर
नि थोडं स्वतःवर.... 1
प्रेम कर मातेवर
आणि बापावर
प्रियतम सख्यावर
नि तुझ्या पिल्लावर. 2

प्रेम करावे रंगांवर
मातीमधल्या गंधावर
आणि वर.    3

प्रेम करावे वाऱ्यावर
चंद्र सूर्य ताऱ्यांवर
आणि साऱ्या साऱ्यांवर...

प्रेम करावे वृक्षांवर
चिवचवणाऱ्या पक्ष्यांवर
आणि जीवनाच्या लक्ष्यावर...

प्रेम करावे लेकरांवर
नाजूक नाजूक कोकरांवर
आणि मखमली फुलपाखरांवर...

प्रेम कर स्वतःवर
तुझ्या निर्मळ सर्व मतांवर
आणि तुझ्या गोतांवर...

रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
10.8.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: