कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

सहवास (दर्पण)

सहवास
सहवास
तुझा लाभावा

सहवास
नामरंग जीवनाने या ल्यावा

सहवास
गाळोनि विकारांना जीव माझा भ्रमरापरी भुलावा

सहवास
ज्यायोगे या विदीर्ण माझ्या गाभारा मनाचा पावनचि व्हावा

सहवास
रुक्ष पानगळल्या जीवनतरुने ध्यास अद्वैताचा घेऊन चैतन्यात अमोघ श्वास घ्यावा

सहवास 

शिल्पा ✒
6/5/19,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: