समाधान...
(वऱ्हाडी रचना )
मायी झोपळीच गड्या
मले सुकाचा महाल
नाई भेव चोराईचा
झोप लागते खुशाल...१
नाई साकई ना कोंडा
झोपळीच्या दरोज्याले
ठेसा भाकर ठेवते
समाधानी या जीवाले... २
झोपळीत नाई पंखा
नाई ये. शी.(AC)ना कुलर
रात-दिवस ऊबारा
जसा आईचा पदर...३
तिच्या चारी कोपर्यात
सुकाचीच चमचम
देते मनाले अधार
समाधान घमघम...४
तिले झाडाचं छप्पर
देव सावलीच होते
जगा दुसऱ्यासाटीचं
आता आमाले शिकोते
... ५
अश्या झोपळीत तुमी
पाहा येकदा ईऊन
महालई राज्याचा रे
तिच्यापुळे सरमीन....६
रचना..
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 10.122018
(वऱ्हाडी रचना )
मायी झोपळीच गड्या
मले सुकाचा महाल
नाई भेव चोराईचा
झोप लागते खुशाल...१
नाई साकई ना कोंडा
झोपळीच्या दरोज्याले
ठेसा भाकर ठेवते
समाधानी या जीवाले... २
झोपळीत नाई पंखा
नाई ये. शी.(AC)ना कुलर
रात-दिवस ऊबारा
जसा आईचा पदर...३
तिच्या चारी कोपर्यात
सुकाचीच चमचम
देते मनाले अधार
समाधान घमघम...४
तिले झाडाचं छप्पर
देव सावलीच होते
जगा दुसऱ्यासाटीचं
आता आमाले शिकोते
... ५
अश्या झोपळीत तुमी
पाहा येकदा ईऊन
महालई राज्याचा रे
तिच्यापुळे सरमीन....६
रचना..
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 10.122018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा