कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

सखी शिल्पा

अतिप्रिय सखी शिल्पा,

वाढदिवस तुझा एक पर्वणी,
आनंदाचा उत्सव जणू मोठा,
सुख,सम्रुद्धी,आरोग्य,समाधान,
चैतन्याचा होवो जीवनी साठा.

मजसाठी आहेस तु एक,
एक लखलखणारा तारा,
तुझ्या सहवासात सदाच,
उजळतो गं आसमंत सारा.

सहज पेरुनी शब्दमाला,
 सुंदर असे काव्य रचितेस,
काव्यास जोडूनी स्वरांना,
सकलांना मंत्रमुग्ध करतेस.

अहोभाग्य माझे गं सखे,
लाभली मज तुझी मैत्री,
बहीणरुपी सखी तु माझी,
असे मज विश्वासाची खात्री.

आज तुझ्या वाढदिवशी ,
मनी वसे एकच सदिच्छा,
पुर्णत्वास जावो तुझे स्वप्न,
होवोत पुर्ण सर्व इच्छा.

सविता ढाकणे
स.शि महारटाकळी
20.02.2019
1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: