दहशतवादाच्या विळख्यात
दहशतवादाच्या विळख्यात
दहशतवादरुपी अजगराचा
दिवसागणिक घट्टच वेढा
देशसुरक्षा, विकास, क्रांती
सुटेनाच गुंतलेला तिढा... ||१||
धर्म नि सत्तेच्या हव्यासापायी
दृष्टी त्यांची क्षीण झाली
संवेदनांची हिरवळ सुकली
सैल माणुसकीची वीण झाली...||२||
एक एक पाऊल पुढे टाकून
छुप्या हल्ल्यांचे त्यांस भूषण आहे
सदोदित केवळ भ्याड हल्ला
मानवजातीस महत् दूषण आहे...||३||
संवेदनाहीन रुक्ष या
वाळवंटी हृदयी
माणुसकी आटलेली
नररुपी दैत्यांठायी... ||४||
देश हाच आस, श्वास
त्याग संसार बंधने
अखेरच्या श्वासावत
गाऊ राष्ट्रस्तुतीकवणे... ||५||
मेघ कुट्ट दाटलेले नभी नि
माथ्यावर तलवार टांगती
जय सर्वदा सत्याचाच होतो
गतकाळानुभव आम्हा सांगती...||६||
आता मनगटातील जोर आमच्या
दाखवल्यावाचून कळणार नाही
भारतमातेच्या पदराला शिवणारांचे
मस्तक धडावर टिकणार नाही...||७||
सजग उभे क्षणोक्षणी
आम्ही भारतीय युवाशक्ती
हाणूनच पाडू डाव रिपुंचा
बळ देई सदोदित देशभक्ती...||८||
................
दहशतवादरुपी अजगराचा
दिवसागणिक घट्टच वेढा
देशसुरक्षा, विकास, क्रांती
सुटेनाच गुंतलेला तिढा... ||१||
धर्म नि सत्तेच्या हव्यासापायी
दृष्टी त्यांची क्षीण झाली
संवेदनांची हिरवळ सुकली
सैल माणुसकीची वीण झाली...||२||
एक एक पाऊल पुढे टाकून
छुप्या हल्ल्यांचे त्यांस भूषण आहे
सदोदित केवळ भ्याड हल्ला
मानवजातीस महत् दूषण आहे...||३||
कळीकाळही कोपला आता
अजब फतवा काढला आहे
घोर संहार अटळ *सत्याचा*
निरोपच कलीने धाडला आहे...||४||
संवेदनाहीन रुक्ष या
वाळवंटी हृदयी
माणुसकी आटलेली
नररुपी दैत्यांठायी... ||५||
देश हाच आस, श्वास
त्याग संसार बंधने
अखेरच्या श्वासावत
गाऊ राष्ट्रस्तुतीकवणे... ||६||
मेघ कुट्ट दाटलेले नभी नि
माथ्यावर तलवार टांगती
जय सर्वदा सत्याचाच होतो
गतकाळानुभव आम्हा सांगती...||७||
आता मनगटातील जोर आमच्या
दाखवल्यावाचून कळणार नाही
भारतमातेच्या पदराला शिवणारांचे
मस्तक धडावर टिकणार नाही...||८||
सजग उभे या सीमांवरती
आम्ही भारतीय युवाशक्ती
हाणूनच पाडू डाव रिपुंचा
बळ देई सदोदित देशभक्ती...||९||
रचना
©शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 8.3.19
दहशतवादाच्या विळख्यात
दहशतवादरुपी अजगराचा
दिवसागणिक घट्टच वेढा
देशसुरक्षा, विकास, क्रांती
सुटेनाच गुंतलेला तिढा... 1
धर्म नि सत्तेच्या हव्यासापायी
दृष्टी त्यांची क्षीण झाली
संवेदनांची हिरवळ सुकली
सैल माणुसकीची वीण झाली...2
एक एक पाऊल पुढे टाकून
छुप्या हल्ल्यांचे त्यांस भूषण आहे
मुँह मे अल्ला,अन् भ्याड हल्ला
मानवजातीस महत् दूषण आहे... 3
कळीकाळही कोपला आहे
अजब फतवा काढला आहे
घोर संहार अटळ *सत्याचा*
हा निरोप कलीनी धाडला आहे.. 4
मेघ कुट्ट दाटलेले नभी नि
माथ्यावर तलवार आहे टांगती
जय सर्वदा सत्याचाच होतो
गतकाळानुभव आम्हा सांगती... 5
आता मनगटातील जोर आमच्या
दाखवल्यावाचून कळणार नाही
या मातेच्या पदराला शिवणारांचे
मस्तक धडावर टिकणार नाही...6
तटस्थ उभे त्या सिमांवरती
आम्ही भारतीय युवाशक्ती
हाणूनच पाडू डाव रिपुंचा
बळ देई सदोदित देशभक्ती... 7
रचना
©शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 8.3.19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा