कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

अयदी पोरं

अयदी पोरं... 

बापाच्या जीवावर आयतं खात
आजकालचे पोरं झाले अयदी
वर्तमानाच्या चुकाईतून केलं
सोताच्याच भविष्याले कयदी... १

इंटरनेटच्या जायात आज 
ते सोताच जाऊन बसले
तैलेई नाई माईत राजाहो
ते कुठी न् कसे फसले.. २

कामधंदा तं जिवारच येते
शान सार्‍या जमान्याभराची
तोंडात पुळी,हाती मोबाईल
कायजीच नाई सकायची... ३

सिगरेटच्या धुपटासंग
संस्कार, शिक्षन फुकतात
छप्पनखेप भांग पाडून
हेल्याच्या वर रेकतात... ४

कामानं कुथान झाला
जीव माय बापाचा 
शौकपानी पुरोत याचे
डोंगर झाला कर्जाचा... ५

तरी फरक पडत नाई त्याईले
येक दिवस फाशी घेते बाप
अयदीपना पेरुन ठुल्यावर
फक्त दुखानच भरते माप...६

खिशात नसतात चाराणे
मंग येते त्याले चेव
अठूनच खरे गुन्हेगारीचे
फुटत असतात पेव...७

रचना ✍️
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि 06.02.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: