कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

घालमेल

 बिभत्स रस

घालमेल...

आज सकाळी नटून थटून
मी येत होते तुला भेटाया...
त्याच बकुळीच्या मोहरल्या
तरुपाशी पुन्हा बहराया..

अन तुलाच स्मरताना मी
मन धुंदीतच वाहत जाय
पुलावरून त्या जाताना
अवचित थबकले पाय..

घेराव घातल्या गर्दीतून
मी प्रयास केला बघण्याचा
कुजबुज समजून जराशी
स्वतःस विसरुन जगण्याचा...

विश्ववेलीच्या सुमास कोवळ्या
एकाकी निपचित सुकलेला
तीक्ष्ण कंटकी जीव बिचारा
श्वासास पाहिला मुकलेला...

मने बावरलेली सारी तेथली
तुटले मी ही आतल्या आत
मोहाच्या पाशात गुंतुनी तो
सोनकळीचा तो होता घात...

असंख्य प्रश्नांनी घालमेल
मग अंतरात अशी घातली
रोजचेच मरण, मग रडे कोण?
सवयीतीलच एक ती वाटली...

कलीयुगी प्रभाव फोफावत
मानव त्या पडतो आहे बळी
संयम खरे का अशक्य इतका?
विरले प्रेम लयाच्या सागरजळी...

©शिल्पा म.वाघमारे
          स.शि बीड
दि 18.1.2019 ✒

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: