अंधाराची पहाट
रवी येतो चढूनिया, डोंगराचा... माथा
अंधाराची होते पहाट, गर्व हरे काळोखाचा...1
झाडीते गं मी अंगण, हुरूप येतो पहाटेला
कमरेला नाही धीर, उभा जन्म संसाराला... 2
दळते ग, मळते गं, हसे भाकरी गालात
वाट पाहे शिदोरीची, धनी उभा गं दारात... 3
मायेला जी माया, सासू कशी ती जाणे ना,
तिच्या लेकीस जपे ती, मज लेक का मानेना... 4
घामाझोकील हा जीव, सदा कामात कुटला,
हात फिरवी जो माथी, आज बाप कुठं गेला... 5
क्षणोक्षणी माझ्या मनी, दाटे कसले काहूर,
मायेच्या पंखांवरी,थेट गाठावे माहेर... 6
सांजेला सांजवात, रात सजनाची मीठी,
पाडे विसर दुःखाचा, जन्म वाहते त्यांसाठी... 7
डोळे मिटता रवीने, पुन्हा काळोखाचा थाट,
स्वप्नं लोचनी अधुरे, पहाटेच्या काळजीत... 8
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 24.02.2019

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा