कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

तीळगूळ

: तीळगुळ

चला रोजच्या धकाधकीतून
आपण उसंत काढूया थोडी
तीळगुळाच्या निमित्तानेच या
स्नेहमयी बंधांस देऊ झळाळी....

तीळासम स्नेहाची नि
गुळाची देऊन गोडी
वीण नात्यांची घट्ट करुया
राग द्वेष मानवा सोडी....

 आकाश असू दे ध्येय तुझे
सांगे पतंग नभी भिडणारा
मात करण्या शीक म्हणे
अन् सदा पुढे जाणारा...

वाण लुटूनी आनंदाचे
मनी गंध पुष्प फुलवावे
फुलपाखरापरी निरागस
निर्मळ स्वच्छंदी उडावे...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 15.01.2019


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: