मातोश्री जिजाऊ वीरकन्या म्हाळसा नि पराक्रमी लखुजींची स्वयंसिद्ध संस्कारी ती दिप्ती तेजस ज्ञानाची...||१|| प्रतिभासंपन्न जिजा वीरा निपुण रणीची राजमाता शिस्तप्रिय माय मृदुला शिवाची...||२|| पर्व दैदिप्यमानच नवयुग ते निर्मिले मढवले संस्कारांनी शिवबास घडवले...||३|| नवे पान महाराष्ट्र सोन्यापरी चमकले गुलामीच्या पाशांतून मराठीस सोडवले...||४|| स्वाभिमानी स्वप्न तुम्ही स्वराज्याचे साकारले स्त्रीशक्तीचे रुप खरे जगतास दावियले...||५|| रचना © शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका बीड दि 13.1.2019 6/5/19, 08:17
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
🚩मातोश्री जिजाऊ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा