दुष्काळ (अष्टाक्षरी)
विठू बरस रे...
ऋतू कोरडा वाहिला
जसा आला तसा गेला
ओल सरली डोळ्यांची
श्वास चातके सोडला...||१||
मैलमैल चाललेल्या
पावलांची पायपीट
वैशाखात पोळूनिया
जमवती घोट-घोट...||२||
मन बाप आभाळाचं
यंदा का गं थिटं बाई
देई चुकारा मेघूट
विरहात काळी आई...||३||
कूस उजवाया तिची
विठू जा रे बरसून
तुझ्या आशेवर श्वास
देई सुगंधाचं दान... ||४||
डोळ्यांतून टिपूसही
आता गळेनासा झाला
साद घालता बापडा
त्याच्या कोरड घशाला...||५||
पांडुरंगा देई यश
यत्ने पाहतो सावरु
बघवेना ही यातना
चैतन्याचा दे बहरु...||६||
टाक ओंजळीत देवा
थेंब चार मोतियांचे
भयाणल्या काळोखात
विठू बरस रे...
ऋतू कोरडा वाहिला
जसा आला तसा गेला
ओल सरली डोळ्यांची
श्वास चातके सोडला...||१||
मैलमैल चाललेल्या
पावलांची पायपीट
वैशाखात पोळूनिया
जमवती घोट-घोट...||२||
मन बाप आभाळाचं
यंदा का गं थिटं बाई
देई चुकारा मेघूट
विरहात काळी आई...||३||
कूस उजवाया तिची
विठू जा रे बरसून
तुझ्या आशेवर श्वास
देई सुगंधाचं दान... ||४||
डोळ्यांतून टिपूसही
आता गळेनासा झाला
साद घालता बापडा
त्याच्या कोरड घशाला...||५||
पांडुरंगा देई यश
यत्ने पाहतो सावरु
बघवेना ही यातना
चैतन्याचा दे बहरु...||६||
टाक ओंजळीत देवा
थेंब चार मोतियांचे
भयाणल्या काळोखात
स्मित देई हिरव्याचे ||७||
बाप माझा शेतकरी
जीर्ण त्याचा जीव झाला
बहू राबला झिजला
तरी रिता परतला||८||
नको करुस हताश
भीक घाल रे श्वासांची
देई मोल त्या घामाचं
भर कणसं मोत्यांची... ||९||
वाट माझी मी काट्यांनी
अविचारे सजवली
दोष देऊ कुणा ठायी
श्वासमाला कुस्करली...||१०||
अविचारे सजवली
दोष देऊ कुणा ठायी
श्वासमाला कुस्करली...||१०||
रचना
© शिल्पा म वाघमारे सहशिक्षिका मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि १५. ०७.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा