कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

तुही थोडं प्रेम कर


तुही थोडं प्रेम कर

तुही थोडं प्रेम कर
तुझ्या बंधुसख्यांवर
चराचर तरुवर
नि थोडं स्वतःवर.... 1

तुही थोडं प्रेम कर
माय आणि बापावर
प्रियतम सख्यावर
नि तुझ्या पिल्लावर. 2

तुही थोडं प्रेम कर
नाजूक  कुसुमांवर
गंध-रंगावर आणि
फुलपाखरांवर.    3

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
10.8.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: