मिरुग.. किती पाहून रायला वाट रे शेतकरीदादा मिरुगाची धगधगते मन अन् कायी आई काय सांगू व्यथा कायजाची सात जूनबी कोळलाच गेला डोयालेच धारा लागल्या खोट्या नाट्या अफवाई हॉटसप, यफबीवर आल्या... लोकईनं केली घाई होते नोते पैशे खरचले बी बियाणं, खताईचे पोते फटाफट घराईत भरले.. काय माईत आता काय खोटं काय खरं आपुनच आपल्या जीवाचं करुन रायलो मातेरं कर्मच लिवते रे नशीब कोणालेच दिऊ नका दोष साऱ्याईन स्वार्थाचे आपापले बनोले कोष मिरुगाच्याच वक्ती बरी आठोते आपल्याले कायी माय वर्स असते हाती सगळं पन कोनी झाळं लावते काय रचना © शिल्पा म.वाघमारे स.शि बीड दि 07.06.2019
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
मिरुग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा