कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

धडपड एक ध्यास

धडपड बीजाची...

उगमापासून युगांतावत
नाते धरेशी जोडतो आहे
लाख संकटे झेलतो तरी
जगण्यास धडपडतो आहे . .॥१॥

मित्रा "धडपड" हेच खरे
आपल्या यशाचे गमक आहे
तुझ्या माझ्या भाग्याला
त्यामुळेच तर चमक आहे . . ॥२॥

ध्येय नभीचे ऊरात तरीही
पाय भुमीतच रोवणार आहे
येऊ दे कैक आपदा वादळे
सदा पुढेच मी जाणार आहे .॥३॥

मी पणा, गर्व अन् ताठा
यांपासून मी अजाण आहे
"देणे"च फक्त जाणतो मी
बाकी मी अज्ञान आहे. .॥ ४॥

जरी इवलासा जीव मी
कर्तव्याची मज जाण आहे
कर्म शुद्धता हिच मानवा
कोटी सूर्यांचं न्हाण आहे . .॥५॥

रचना
*शिल्पा म.वाघमारे*
 (स.शि.) जि.बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: