कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

सखी... घे भरारी

 घे भरारी....


मळभ मनाचे सारुनी तू
हो रचयिता दिव्य इतिहासाची
भ्रमित करती तुजला भास
तरी ओळख पाऊले काळाची...१

तोड सारी बंधने ती
ओळखून डाव परंपरांचे
विज्ञानाची कास करी घे
साध लक्ष्य आभाळीचे... २


सखे हस ना मोकळी
नि घे बघ उंच भरारी
गुदमरल्या श्वासांनाही
देई वाट मोकळी सारी... ३


क्षण मौल्यवान हाताशी
आता न घेई माघार
दवड ना पळ(क्षण)
पुरे तो खल, तो विचार... ४

कल्पनापंखांची सये
घे उत्तुंग भरारी
इतिहास नवा अनोखा
फक्त तूच घडवणारी...५

सामावून कवेत तुझ्या
अथांगता आभाळाची
तोडून बंधने व्यर्थ
नि सीमा चार भिंतींची ...६

टाक पाऊल पुढचं
भिरकावत जुना विचार
तूच उज्ज्वलाची आभा
खुणावे तूज विश्वागार... ७


रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. १.१०.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: