बेरोजगारी बापानेच हाडे सारी कुटकूट झिजवली मनमौजी जीवाला या सुखे त्याने पुरवली...1 थकलेला भागलेला सोसवेना त्यास भार लाज वाटली मनाला वाटे द्यावा त्या आधार...2 काहिसाच अनोळखी आज देखिले जगास सोपं काहीच नसतं पटलेही या मनास...3 ढीगभर पुस्तकांचं कोठे हो दडलं ज्ञान? पोटासाठी मरमर वेड्यापरी रानोरान... 4 आज आभाळ फाटलं हात बापाचा सुटला त्याच्या घामाच्या धारांचा सागरही तो आटला...5 वीतभर पोटातली रोजचीच धगधग टुकड्याच्या शोधापायी रातंदिन तगमग...6 वणवण हिंडतोय अजूनही जिथे तिथे काम नाही दाम नाही 'ऐश' होती फक्त तिथे...7 बेरोजगारीत कसा ओढू गाडा संसाराचा छळतेय जीणे आता मृत्यू वाटे जवळचा... 8 कर्तव्यात ना कसूर सांगे आवाज आतला आड-विहीरीच्या मध्ये जीव बिचारा फसला... 9 रचना ©शिल्पा म.वाघमारे स.शिक्षिका, बीड दि 2.2.2019
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
बेरोजगारी
लेबल:
कृष्णार्पित काव्यशिल्प
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा