आक्रोश कुठवर राहसी उभा विटेवर ठेवूनिया कर कमरेवर आर्त हाकेस साद माझ्या देऊन एकदा जा||१|| मांडलास पसारा या जगती बघ्यासारखा का तू बघशी आवरेना आवेश हा सावरून एकदा जा||२|| उरात उठले द्वंद्व किती उरली फक्त इथे भीती गुंतागुंत विचारांची या सोडवून एकदा जा||३|| आचार त्यांचे झालेत भ्रष्ट वासनांध ते उरलेत दृष्ट माजलेल्या दानवांस त्या घेऊन एकदा जा||४||
जीवघेणे हे किती हलाहल ओततसे हृदयी त्या कोमल पांडुरंगा पुन्हा होऊनी शिवा त्या पचवून एकदा जा ||५|| कोणते पर्व हे कलीयुगाचे माजले स्तोम नित् षड्-रिपुंचे "गीता" मनी पुनः प्रत्येकाच्या उतरवून एकदा जा||६||
रचना ••••• शिल्पा म.वाघमारे *स.शि.मालेगाव खुर्द *ता गेवराई जि.बीड 6/5/19, 08:50 -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा