पाऊसराजा
पाऊसराजा आज बरसला
माझ्या अंगणात
त्याच्या सवे चला नाचु
खेळू गाणी गात
सारे जण चला चला
नका राहू कोणी
मजा घेऊ भिजण्याची
आनंदाच्या खाणी
घाबरुच नका नका
होऊ द्या सर्दी खोकला
खिडकीतून पाऊस बघण्यात
आनंद तो कसला!
चिऊ ,काऊ मोर बेडूक
सारेच होती चिंब
आपणही लुटुया ना
मोतियांचे थेंब
भरलेला मेघ काळा
बोलावितो मला
मी तर चाललो गड्यांनो
तुम्हीही आता चला
पाऊसराजा आज बरसला
माझ्या अंगणात
त्याच्या सवे चला नाचु
खेळू गाणी गात
सारे जण चला चला
नका राहू कोणी
मजा घेऊ भिजण्याची
आनंदाच्या खाणी
घाबरुच नका नका
होऊ द्या सर्दी खोकला
खिडकीतून पाऊस बघण्यात
आनंद तो कसला!
चिऊ ,काऊ मोर बेडूक
सारेच होती चिंब
आपणही लुटुया ना
मोतियांचे थेंब
भरलेला मेघ काळा
बोलावितो मला
मी तर चाललो गड्यांनो
तुम्हीही आता चला
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि.
जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी जि अकोला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा