कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

हिरवा डोंगर

हिरवा डोंगर

ऋतु  वर्षा येता पुन्हा
 राने वने शहारली
हिरवळीची ती शाल
धरणीने पांघरली। . ॥१॥

मैदान पठारे नि
माथा टेकडीचा 
हिरवाचं  साज
ल्याला माळ डोंगराचा ॥२॥


खग विहार करती
मुक्त त्या डोंगरी
जल वाहे खळाखळा
डोंगराच्या कपारी ॥३॥

नाचती गाती  मयुर
मेघाच्या आगमने
कडाडत्या चपलाही
करती थरार नर्तने॥४॥

अनुरागी शहारले तेथ
तरुवर  नि चराचर
पोर- सोरं ही गावची
भाळली त्या डोंगरावर॥५॥


नाचती गाती  मयुर
मेघाच्या आगमने
कडाडत्या चपलाही
करती थरार नर्तने॥६॥

रचना
      शिल्पा म.वाघमारे
                बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: