उनाड वारा
वारा उनाड खट्याळ किती सावरु पदर जाता नजर सख्याची झाले लाजून मी चूर ||१ || वारा अवखळ भारी जसा साजन साजन येता जाता काढी छेड अंग आलं शहारून ||२ || वारा उनाड हा भारी सैरभैर ही नजर त्याच्या नादी रंगले मी चित्त नसे थार्यावर ||३|| वारा उनाड चपळ म्हणे चल सवे माझ्या जाऊ क्षणात उडूनी आज देशी साजनाच्या ||४ || क्षणापुर्वीचा उनाड मंद झुळुक तो झाला गाली अधरच सखा जणू फिरवून गेला ||५|| ✍🏻✍🏻✍🏻रचना..... *शिल्पा म.वाघमारे* स.शि. बीड 8/18/18, 18:50 - Shilpa: *पाऊस पहि
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा