कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ बालकविता चिमणचारा

चिमणचारा*

इटुकल्या चिऊचं 
बाळ बाई पिटुकलं 
मायेच्या घरट्यात 
राहतयं धिटुकलं        ॥१॥


पहाटेच बाळासाठी
ऊठतसे चिऊताई 
चिमणचारा शोधायला 
भूरभूर उडून जाई   ॥ २॥


एकटचं पिल्लू तिचं
घरट्यात राहतं 
देवच  बाई त्याचं 
रक्षण करतो         ॥३॥

पोटासाठी चिऊची
रोजचीच पळपळ
पिल्लाच्या काळजीने
काळजात धडधड     ॥ ४॥

चिऊ येता मग घरी 
पिलू फुलूनच जाई 
बिलगून म्हणे तिला 
पुन्हा नको जाऊ आई    ॥ ५ ॥

हळूहळू तेही आता 
उडायला हो शिकलं
दाणा त्याच्या शोधायला 
दूरदूर ते  धावलं         ॥ ६॥

पिल्लू झाले मोठे तरी 
तिच्या काळजाला घोर
कशी चिंता ही आईची
न सरे जीवनभर         ॥ ७॥

रचना......📝
         *शिल्पा म.वाघमारे*
                 *बीड*
10/5/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: