राममय मन....
संसाराचे सुख |चमक बेगडी ||
विकारांची बेडी| हाती पायी ||१||🌹
निस्वार्थ वाहिले| त्यागिले जीवन||
मनपुष्पार्पण |पायी तुझ्या ||२||🌹
येथे विषयांनी | उच्छाद मांडले ||
पाठीशी लागले | निशदिन ||३||🌹
विकारांचे ताप | शमवण्या येई ||
कर आता घाई | सीतावरा ||🌹
देई हाचि वर | जन्मजन्मांतरी ||
या चरणांवरी | लागो ध्यान ||४||🌹
समसमानच |आनंद नि दुःख |
दावी मज मुख | रघुनाथा||५||🌹
शर-चापधारी | राजीव लोचना ||
वाहिले या मना | तव पायी ||६||🌹
विषयविकारे | व्यापिले जे मन ||
तेथे कैसे स्थान | तुझे देवा ||७||🌹
आत्मज्योतीने मी | ओवाळीते तेजा ||
अयोध्येच्या राजा| स्विकारावी ||८||🌹
साधना तुझीच |नामाचे वलय|
मन राममय| झाले आता ||९||🌹
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि. मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 23.12.2018