कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

कापूस

कापूस"


अबाया इकडे पाऊ पाऊ
दिवसाचीबी मंग रात होते
डोयाले डोया नाई लागत
रातभर तेच कायजी कोरते.... १


जीर्ण झाला जीव आता
होतं नोतं पनाले लावलं
येक दोनच नाई राजेहो
तीन खेप म्या वावर पेरलं... २


रातभर पानी देत रायतो
लाइनई काई साथ देत नाई
फवारे दिऊदिऊ रिकामा झालो
तरी जात नाई लाल्या न् अई... ३


घासई गोळ नाई लागत आता
पराटीच्या इकडेच पायत रायतो
बायको लेकराईच्या कायजीनं
इचारा-इचारात झुरत रायतो.... ४


कापूस तं आता गेल्यातच जमा हाय
झगडीन मी जीवात अशेलोक जीव
पण जीव नाई देणार मी कदीच
कदीतरी तं वरच्याले बी ईनच कीव... ५


रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: