कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

ये ना कान्हा...

  


छुमछुम पैंजण नाद
गोकुळावत घुमु दे पुन्हा
धडधड काळजात
झडकरी ये रे कान्हा... १ 

धाव हरी दुडूदुडू
चोरण्यास सारं लोणी
गोड गाऱ्हाणे गावया
येतील त्या गवळणी...२ 

यमुनेच्या जळानेही
वाढवली खळखळ
पुन्हा तुझ्या स्पर्शासाठी
झाले बघ उतावीळ...३ 

हंबरती रानी धेनू
सळसळ पानांतूनी
झुळझुळ वारा वदे
हाक घे रे समजूनी...४

मन आज उचंबळे
सूर श्रवण्या माधुरी
येई एकदा मुरारी
ओठी लाव ना बासरी...५

न्याहाळीन रात्रंदिन
दासी होऊन पाऊली
तुला नाही कळणार
या रे जीवाची काहिली... ६

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 15.4.2019
10/6/19,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: