प्राण्यांची सभा*
आले आले हत्तीदादा
झुलवत मान
हलवत कान..... 1
आले आले माकडदादा
मारत उड्या
करत खोड्या... 2
आले आले कोल्हे भाऊ
भोळी मूर्त
भारी धूर्त.... 3
आले आले घोडोबा
टाकीत टापा
मारीत धापा.. 4
आले आले अस्वलदादा
खाजवीत अंग
काळा रंग.... 5
आले हो जिराफकाका
उंचच उंच मान
साऱ्यांवर ध्यान.... 6
वाघोबाची आली स्वारी
तो डरकाळी
मोठी फोडी... 7
वनराज सभेत येता
हरले हप्
बसले गप्.... 8
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
12/8/18,
आले आले हत्तीदादा
झुलवत मान
हलवत कान..... 1
आले आले माकडदादा
मारत उड्या
करत खोड्या... 2
आले आले कोल्हे भाऊ
भोळी मूर्त
भारी धूर्त.... 3
आले आले घोडोबा
टाकीत टापा
मारीत धापा.. 4
आले आले अस्वलदादा
खाजवीत अंग
काळा रंग.... 5
आले हो जिराफकाका
उंचच उंच मान
साऱ्यांवर ध्यान.... 6
वाघोबाची आली स्वारी
तो डरकाळी
मोठी फोडी... 7
वनराज सभेत येता
हरले हप्
बसले गप्.... 8
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
12/8/18,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा