अनुप्रास अलंकारिक रचना *राधारमण* राधेचा रमण नंदाचा नंदलाल गवळणींचा गोपाळ करितो कमाल..... भाळीचे भाग्य भारी सकळदेवाधिदेवा सांभाळी अच्युताच्या आगमने रमली राऊळी.... गाती गाऱ्हाणे गोकुळी गवळणी गुंग मैतरांच्या मेळ्यासंगे. रंगी रंगला रंग मातेच्या माघारी खट्याळाच्या खोड्या माधव मनोहर चतुर चहाड्या..... सर्वांसाठी सार गंधीत गीतांगण कर्म कर्तव्याची अविरत अर्पण... साधून साधर्म्य ज्ञेय ज्ञानाज्ञानाचे अद्भुत अद्वितीय कथन कान्हाचे..... रचना ✍️ शिल्पा म.वाघमारे स.शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 23.09.2018
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
राधारमण
लेबल:
कृष्णार्पित काव्यशिल्प
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा