कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

दिवाळी आनंदपर्व

दिवाळी

दिपावली पर्व मंगल तेजाचे
एकमेकांच्या धूर स्नेहमिलनाचे
पावन ज्योतिर्मय जागराने
होईल पारिपत्य अज्ञानाचे...१ 


गोष्ट एक लाखमोलाची
सांगते पणती कोपर्‍यातली
दिव्याच्या लोभापायी नको
विझवू पणती गर्भातली...२ 


जीवनही अगदी असंच असतं
जणू मातीची इवलीशी पणती
प्रकाश देत राहू श्वासांतावतही
सत्कर्मच मानवाची खरी गती... ३ 


माथी रेखू टिळा यशाचा
औक्षण करु दिनी सौख्याच्या 
ओवाळणी लाभो निर्भेळ आनंद 
यशकिर्ती पसरो दिगंती विश्वाच्या... ४

मनोभावे पूजन करता
लक्ष्मीनारायण येतील घरा
सजवता मनी तयांची पाऊले
मनाने भिजावे सुखसागरा.... ५


रचना 
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: