कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

*अंगणी माझ्या....*

: *अंगणी माझ्या....*

माझ्या ग अंगणी
चिऊताई राणी
ठेविले दाणापाणी
तुझ्यासाठी...... 1


माझ्या परसात
बहरली जाई
गंध रानी जाई
दूरदूर........... 2


परसात माझिया
चाफा तो फुलला
गीत तो गायला
माझ्यासवे...... 3


राजा तो फुलांचा
गुलाब खुलला
गालात हसला
खुदकन.........4

सांजवेळी आई
लावी सांजवात
प्राजक्त मोहरला
सुगंधीत.........5

✒✒✒
   रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
15.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: