: माझी लेक
तुझ्या येण्याची बाळा
लागता मज चाहूल
मन सैरभैर होते
नि स्वप्नांची रेलचेल...
कोण ते सौभाग्य माझे
तू भुलविले मन गुंतविले
लेक होऊनी आली पोटी
नवसंजीवन मज लाभले...
दुःख आणि यातनांची
उणिव नव्हतीच तशी
पण तुझ्या स्पर्शाने
सारीच गळलीत जशी...
गोजिऱ्या पदकमलांना
लडिवाळा मी पाहे नित्य
वाट सरली डोळ्यांची
तुझ्या येण्याचे अगत्य...
दुडुदुडु धावणे नि
चुटूचुटू लाडिक बोल
भान हरपे, ध्यान लागे
मज लाभले रत्न अनमोल...
विश्वाला घाल गवसणी
उफाळू दे नवे तूफान
तू ध्येयाचा ध्यास घेऊन
संकटाना दे आव्हान...
भय सार सारे अंतरीचे
कर दुःखांना पराजित
यशाची वाट सजेल सुमांनी
काळासही होऊ दे भयभीत..
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ३.१०.२०१९
तुझ्या येण्याची बाळा
लागता मज चाहूल
मन सैरभैर होते
नि स्वप्नांची रेलचेल...
कोण ते सौभाग्य माझे
तू भुलविले मन गुंतविले
लेक होऊनी आली पोटी
नवसंजीवन मज लाभले...
दुःख आणि यातनांची
उणिव नव्हतीच तशी
पण तुझ्या स्पर्शाने
सारीच गळलीत जशी...
गोजिऱ्या पदकमलांना
लडिवाळा मी पाहे नित्य
वाट सरली डोळ्यांची
तुझ्या येण्याचे अगत्य...
दुडुदुडु धावणे नि
चुटूचुटू लाडिक बोल
भान हरपे, ध्यान लागे
मज लाभले रत्न अनमोल...
विश्वाला घाल गवसणी
उफाळू दे नवे तूफान
तू ध्येयाचा ध्यास घेऊन
संकटाना दे आव्हान...
भय सार सारे अंतरीचे
कर दुःखांना पराजित
यशाची वाट सजेल सुमांनी
काळासही होऊ दे भयभीत..
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ३.१०.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा