कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

गजरा

गजरा


तुझ्याच साठी सजले नटले
आज रात साजना मिलनाची
कटाक्ष एक तुज घेईन खेचून
जशी रती आज मी मदनाची *१*


मोहरलेल्या रजनीलाही
नशा चढावी पुनःपुन्हा
जाळ्यात ओढला जाऊनी
घडू दे ना तो मधूर गुन्हा *२*


स्नेहमिलन होईल दो जीवांचे
विचारानेच काया बघ फुलली
माळशील ना गजरा कलिकांचा
लटकेच लाज बघ मज आली *३*


शृंगार बेगडी नकोच मजला
गालावर अवचित येईल लाली
तव स्पर्शाचे मृदू मयूर पिसारे
फिरता मम् कोमल तनूवरी *४*

आठवानेच रंग हा अधरी
सेजेवर होईल काय दशा
चूरचूर जरी लाजेत नाहले
चिरस्मरणीय होऊ दे नीशा *५*


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि.15.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: