कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

❓७ काव्यमय कोडे... पुस्तक ?

काव्यमय कोडे...
 
सांगा पाहू?

सदैव तुजला मी देईन साथ
मग अज्ञानावर करुया मात
मैत्रीचा माझ्या पक्का वादा
सांग देशील का हाती हात?... १

सोबत मी, मग कसली चिंता
अविचार पुरे, सोडवूया गुंता
नकोस भाळू मृगजळावरी तू
आभाळ मोकळे, झेप घे आता...२

तेजोमय ती सृष्टी बघ सारी
तुला खुणविते रे, घे भरारी
सर्वज्ञ तूच,तुज जाण होऊदे
ना फिरण्यास, परत माघारी...३

जरी मित्र तुजला बहू लाभले
तंत्रज्ञानाचे वाहते वारे
तरी वाचन हे अन्न मनाचे
ज्ञानचि तारी जीवन सारे...४

ओळखले असशील दोस्ता
तू नक्कीच मला जरी रे
सोडणार नाहीस ना साथ!
पुस्तक मी, सखा तुझा रे... ५

रचना
© शिल्पा म.वाघमारे
        सहशिक्षिका
            बीड
दि. 14.05.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: