होणे नाही पुन्हा जगी असा
प्रतिभासंपन्न असा घटनाकार
ज्याने जपले माणुसकीचे फूल
नि अन्यायावर केला प्रहार....
संविधानरुपी न्यायदीपिकेत
समता, बंधुत्वास दिला थारा
प्रतिष्ठाही जपली सामन्यांची
नि एकतेचा दुमदुमला नारा...||२||
एक नागरिकत्व नि मताधिकार
यांमध्ये गुंफले तुम्हा-आम्हाला
'धर्मनिरपेक्षते'च्या शब्दप्रभावाने
माणूसपण आले या मनुजाला..||३||
जगतामध्ये महान अशी ही
एकमेवद्वितीय 'घटना' आधार
लवचिकताही अजोड साधून
अपराधांवरही परखड वार....||४||
जोडूनी करा चला करुया
अभिवादन महामानवाला
मानवंदना ही आमुची त्या
प्रदीप्तिमान दुधारी प्रज्ञेला.... ||५||
वादळातील दीपस्तंभ भीमा
झगडला नि झटला अविरत
संविधानरुपे हृदयी आमच्या
युगे युगेच जो राहिल तेवत...||६||
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि.6.12.2018
मानवंदना ही आमुची त्या
प्रदीप्तिमान दुधारी प्रज्ञेला.... ||५||
वादळातील दीपस्तंभ भीमा
झगडला नि झटला अविरत
संविधानरुपे हृदयी आमच्या
युगे युगेच जो राहिल तेवत...||६||
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि.6.12.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा