कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

मैत्र

मैत्र दिन विशेष*

मैत्र म्हणजे बंधन
      हृदयाचे अविरत स्पंदन

मैत्र म्हणजे अाधार
      योग्यायोग्यतेचा स्विकार

मैत्र म्हणजे तिसरा हात
       पदोपदी सहृय साथ
       
मैत्र  एक पर्व आहे
       गौण बाकी सर्व आहे

मैत्र म्हणजे जिव्हाळा
       मनी प्रितीचा उमाळा

मैत्र म्हणजे विश्वास 
      प्राण देणारा श्वास

मैत्र म्हणजे कला
      जगणे शिकवते आम्हांला 

मैत्र म्हणजे सुंदर नातं
       खोल काळजाच्या आत

रचना✍🏻
✨शिल्पा म.वाघमारे✨
         स.शि. बीड
8/18/18

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: