आस* दर्शन द्या सर्वेश, मजला दर्शन द्या सर्वेश वाटेवरती नयन तुझ्या रे त्राण न उरले शेष ॥धृ॥ वाहती निर्झर नयन कपारी अंत पाहसी तू कुठवरी शोधू कुठे अन् कुणास सांगू आवरेना आवेश. . . ॥१॥ मन लागेना घरी संसारी वाहिले मज मी,तव चरणावरी ध्यास तुझा रे मना लागला धाव घेई परमेश . . .॥२॥ मोहाचे नच उरले बंधन सोडवी मज, कसले हे कोंदण तुझ्याच रंगी मन हे रंगले वाटे परका हा देश. . ॥३॥ मौक्तिक तू, मी मृत्तिक रास तुझ्याच नामी,गंधित श्वास दर्शनास मन अधिर जाहले मोक्ष नको हे ✍🏻✍🏻✍🏻 *रचना* शिल्पा म.वाघमारे स.शि.बीड *दि.7/8/18* 8/18/18,
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
गीत 🎤आस....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा