भाकरीचा चंद्र उभा जन्म मी वाहिला अठराविश्वे दारिद्र्याला त्याची झळ लागू नये तिच्या सोनेरी स्वप्नांना . . . कुशीतून तिज जगवले राबूनही शिकवणार आहे गर्भात कळी खुडणार्यांना मी ही लाजवणार आहे. . माझ्या संसाराला कशी असे अवसेची रात चंद्र भाकरीचा कधी दिसेल का माझ्या नभात तरी शिकवते तिला तग धरण्याची कला धीर सोडू नको पोरी दया येईल ग त्याला पुनवेची ती रातही माझ्या येईल वाट्याला भोग सरंल आमचं सुख येईल पदराला शिल्पा म.वाघमारे बीड २.८.२०१८
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
भाकरीचा चंद्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा