कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

आई माझी शान






आई माझी शान...


माझी आई माझी शान
ईशरुप ते महान
वात्सल्याची आहे खाण
          परब्रह्मस्वरूप . . .॥१॥

माझ्या मातेची महती
तुम्हा सांगु तरी किती
तिजविण काय गती
          जगतात हो माझी. ।॥२॥


तिचा पदर मायेचा
वृक्ष शीतल छायेचा
जन्म माझा पुण्याईचा
          हेचि परमभाग्य . .॥३॥

तिचे उपकार थोर
मी हो लेकरु पामर
ऋण कसं फेडू सारं
       अशक्य जन्मोजन्मी . . ॥४॥


रचना. . .

शिल्पा म.वाघमारे
   स.शि. बीड
७.८.१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: