*मन माझं* मन माझं प्रभूचरणी वाहिलेलं मन माझं फक्त राम होऊन राहिलेलं मन माझं राम रंगी रंगूनी चिंब चिंब नाहलेलं मन माझं संसाराच्या तापाची धग सोशीत सदैव दुःखाच्या आगीत दाहलेलं मन माझं दिव्यत्वाच्या अखंड अविनाशी तेजामध्ये अज्ञानावर मात करुन समाधीत तल्लीन झालेलं मन माझं रचना ✍️ शिल्पा म.वाघमारे स.शि बीड 25.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा