गड किल्ले
आण बाण शान आहेत
गडकिल्ले महाराष्ट्राची
शिरपेच मायमराठीचे
नि संपत्ती मन्मातेची... १
अजिंक्य तटबंदी नि
बुरुज भक्कम आधार
वास्तुशिल्प अजोड असती
समृद्ध वैभवी भर... २
ऐतिहासिक नि राजकीय
वारसा मराठी संस्कृतीचा
दुर्ग तर अविभाज्य अंग
या मायभू महाराष्ट्राचा... ३
अतुलनीय भुईकोट तसे
अद्भुतच गिरीदुर्गही
न्याऱ्याच डौलात खडे
जंजिऱ्यासम द्विपदुर्गही...४
श्री छत्रपती शिवरायांनी
शपथ घेऊन स्वराज्याची
शर्थीने लढवला एकेक दुर्ग
बाजी लावूनी प्राणांची... ५
असामान्य भूषण अपुले
खचले झिजले जरी वार झेलुनी
शूरविरांनी प्राण वेचले
उभे ताठ ते मोल जाणूनी. ६
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि १२.११.१९
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि १२.११.१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा