बालकाव्य...
आई मला खाऊ हवा
आई गं आई...
आई आई आई...ईईई
अगं आई आई आई...ईईई
वेळ काढ ना थोडा
काम किती करशील बाई...||धृ||
मी बघ ना आताच
आलोय शाळेतून
पोटात कावकाव चालली
जाम दमलो गं खेळून...
पोळी भाजी तोंडाला रुचेनाच काही
लाडू थोडा खावा म्हणतो, देशील का गं आई.... ||१||
थकल्यासारखं वाटतंय गं
अभ्यास करून करून
लाडू तर मघाशीचा
गेलाही असेल विरुन
पाच रुपये देशील तर आत्ता आणतो काही
बिस्किटेच खातो, जेवायची ही वेळ नाही... ||२||
ताईचा वाढदिवसाला
मज्जा येईल आगळी,
नकोच करुस काळजी
तुला मदत करेन सगळी
पेढाच दे ना एक, मागत मी दुसरे नाही
गुपित ठेविन सारे, तिला कळणार नाही काही...||३||
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १३.११.१९
आई मला खाऊ हवा
आई गं आई...
आई आई आई...ईईई
अगं आई आई आई...ईईई
वेळ काढ ना थोडा
काम किती करशील बाई...||धृ||
मी बघ ना आताच
आलोय शाळेतून
पोटात कावकाव चालली
जाम दमलो गं खेळून...
पोळी भाजी तोंडाला रुचेनाच काही
लाडू थोडा खावा म्हणतो, देशील का गं आई.... ||१||
थकल्यासारखं वाटतंय गं
अभ्यास करून करून
लाडू तर मघाशीचा
गेलाही असेल विरुन
पाच रुपये देशील तर आत्ता आणतो काही
बिस्किटेच खातो, जेवायची ही वेळ नाही... ||२||
ताईचा वाढदिवसाला
मज्जा येईल आगळी,
नकोच करुस काळजी
तुला मदत करेन सगळी
पेढाच दे ना एक, मागत मी दुसरे नाही
गुपित ठेविन सारे, तिला कळणार नाही काही...||३||
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १३.११.१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा