चुकीला माफी नाही निसर्ग हा महादानी दातृत्वाचा एकमेव धनी अविचारी आचरणाने मित्रा फक्त फक्त होतेय हानी... १ 'मी'पणाचा कळस गाठतोय स्वार्थापोटी कुकर्म करुनी मृत्यूच्या दारी चढाओढ जणू कुकर्मांच्या पायर्या चढूनी...२ मनमानी कारभार नित्याचा ही फक्त एक चूक नाही गुन्हेगार तुझा तूच आहेस आज आणि उद्याचाही... ३ पण लक्षात असू दे पक्के गुरु 'तो' ही शिस्तीचा भोक्ता चुकीला माफी नाहीच येथे समतोल साधायचा त्याचा मक्ता..४ आताही उघड ते मनःचक्षू घे वेध अंधाऱ्या भविष्याचा तूच हो हितचिंतक स्वतःचा अन् हाणून पाड डाव कलीचा...५ रचना © शिल्पा म.वाघमारे स.शि बीड दि 17.05..2019
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
चुकीला माफी नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा