आनंद आनंदासाठी जगतो क्षणक्षण किती रे करसि मरमर तू शोधसि त्या जळी स्थळी पण सांग काय मिळविलेस तू..... 1 आनंदापायी दुःखही पदरी कित्येकदा झेलतोस तू जगती या जगण्या सुखाने पुन्हा पुन्हा मरतोस तू.....2 कधी लोभाने कधी स्वार्थाने आप्तांशीच वागतोस तू मोहपाशाचे बंध स्वतःच्या पायातच बांधतोस तू... 3 येता जरी थोडेही अपयश खचून व्यसनी बुडतोस तू क्षणिक मिळाया सुख देहाचे वासनांधही बनतोस तू.....4 संसारी या आनंदासाठी सदैव वणवण करसि तू चिरकाल फक्त तो प्रभुपायी का शरण तया ना जासि तू.... 5 रचना शिल्पा म.वाघमारे स.शिक्षिका बीड दि. 31.10.2018
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
आनंद
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा