कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

गंधाळला मोगरा

गंधाळला मोगरा


गंध पसरला आज साऱ्या रानी
आनंदानं डुले मन हे सजनी....१

पानोपानी दडे हसतोय गाली
सुंदराच भासे हिरव्या महाली...२

शुभ्र चांदण्यांची लखलख तेज
तनसह मनही मढवी साज....३

माळताना पुन्हा स्पर्श ते स्मरले
रोमारोमी मी त्यासम मोहरले... ४

टवटव तयाची उभारी मना
अनुरागी भारलेला तू सजना..५

लाजेतच चूर हाय मी नाहले
पंखांवर ढगांच्या स्वार जाहले..६

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
10.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: