कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

परी माझी समृद्धी



    परी माझी

लेक माझी साजिरी
सुंदरा मधुरा गोजिरी
अप्सरा गोडुली जशी
मृदुलाच माझी परी... १

बोल बोबडे मला
आपसूक खेचतात
तुरुतुरु डौल चाल
नजरेला बांधतात... २

पुष्पांहुनी कोमल गाली
सुहास्य ते उमलते
चंद्रखळीत मनोहारी
जग सारे विरघळते...३

समृद् ध साऱ्या गुणांनी
चंचल चाणाक्ष दुहिता
'समृद् धी' परी माझी
मम् जीवनाची अस्मिता ... ४


जावे सजवित तू यशवाटा
नित्य रहा तू विजेता
भयासही कर भयभीता
आशीर्वत मातेचा ..५

पाहिली का कुणीतरी 
आकाशातील परी
जीवनास सोनगंध देणारी
हिच परी आहे खरी... ६

सांगू तुज आज कशी
स्वर्ग सुखाच्या तू राशी
सारीच गळलीत जशी
दुःखाची मळभं.... ७

रचना

©शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका, बीड
दि १४.११.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: