- *गुपित मनाचे सांगू कुणा.*
मन धाव घेई अवचित
अवघड वाट तयाची
कुणासही न लागे छडा
गती वाऱ्याहुन वेगे त्याची... १
विचारांची गुंतागुंत
घालमेल भावनांची
कधी बावरीच स्थिती
द्विधेत अडकून मनाची...२
संज्ञा ही तयाची कोणा
न करविते हो सहजे
काय देऊ मनास उपमा
मतीसही ना उमजे...३
गुपित मनाचे सांगू कुणा
कशी करु याची मनधरणी
ओझं मनावरचं अपरिमित
अर्पिते मी यास हरीचरणी...४
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि २०.११.२०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा