कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

उधळीत रंग... आला वसंत"


"उधळीत रंग... आला वसंत"


सरोनी शुष्क शिशिर,
बहरला हा वसंत 
चैत्रमासी त्याच्या रंगी,
रंगला आसमंत...१

नटली ही वसुंधरा
रंग नवा ल्याली
नववधूच ती जणू
सोन्यामोत्यांनी मढली...२

कुसुमांच्या पाकळीत
हसू चोरटेच गाली
लाजेची मग बोले
गुलाबी ती लाली...३

मोहरल्या आमराईत
घमघम दरवळ
पानांआड कोकिळेचा
सुस्वरही ये मंजुळ...४

देह तरुंचे फुलले
पानपान मोहरले
रस शृंगाराचे तेथ
वसंताने शिंपियले... ५

पर्ण मृदुल पोपटी
कुठे लालीच्याही छटा
चित्र सजीव भुलवी
वाटसरुंच्याही वाटा... ६

रम्य सोहळा ऋतुंचा
रेखी अनोखी रांगोळी
नवरंगी उधळण
मुक्त सृष्टीचीच होळी... ७

विरहिण उमलते
वसंतात आनंदानं
अधीरता क्षणोक्षण
होण्या साजन मिलन...८



रचना

© शिल्पा म.वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि 31.03.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: