अनाथांची दिवाळी.... करुणरस
अवसेची कुट्ट ती रातही
लख्ख पुनव भासणार आहे
या मनांच्या गाभाऱ्यात मात्र
तोच काळोख असणार आहे.. १
अनंत मंद दीप उजळणारे
विदीर्ण मना हेलावून सोडतात
घोटभर तेलावाचून मात्र इथे
कोरडेच तुकडे पोटात दडतात... २
दारिद्र्याच्या झळा सोशीत
मायेने दिला होता जन्म
धग दुष्काळाची घातकी
झालोत अनाथ आजन्म.....३
मरमर करूनही आमची
आनंदात करी 'ती' दिवाळी
विसरू कशी पदराखाली
झाकत असे फाटकी चोळी...४
नाही नशिबी या फुटक्या
गोडाधोडाचा तो घास
बाहेर पणत्यांची झिलमिल
आत काळोखाचा वास......५
'तो' ही भाकतो करुणा कधी
प्राणज्योती तेवढी तेवत ठेवतो
सुटाबुटातला साहेब बनून
झोळीत काहीतरी टाकत राहतो... ६
माय बनू पाहतेय आता
चिल्यापिल्ल्या भावंडांची
पोट फक्त भाकरी मागतं
आस नाही हो दिवाळीची....७
जरी व्यथा घोकतेय तुम्हापुढे
जाणते मी, हे बदलणार नाही
सटवीने लिहीलेलं मस्तकावर
काळही पुसून शकणार नाही... ८
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका,
बीड
दि. 9.11.2018
अवसेची कुट्ट ती रातही
लख्ख पुनव भासणार आहे
या मनांच्या गाभाऱ्यात मात्र
तोच काळोख असणार आहे.. १
अनंत मंद दीप उजळणारे
विदीर्ण मना हेलावून सोडतात
घोटभर तेलावाचून मात्र इथे
कोरडेच तुकडे पोटात दडतात... २
दारिद्र्याच्या झळा सोशीत
मायेने दिला होता जन्म
धग दुष्काळाची घातकी
झालोत अनाथ आजन्म.....३
मरमर करूनही आमची
आनंदात करी 'ती' दिवाळी
विसरू कशी पदराखाली
झाकत असे फाटकी चोळी...४
नाही नशिबी या फुटक्या
गोडाधोडाचा तो घास
बाहेर पणत्यांची झिलमिल
आत काळोखाचा वास......५
'तो' ही भाकतो करुणा कधी
प्राणज्योती तेवढी तेवत ठेवतो
सुटाबुटातला साहेब बनून
झोळीत काहीतरी टाकत राहतो... ६
माय बनू पाहतेय आता
चिल्यापिल्ल्या भावंडांची
पोट फक्त भाकरी मागतं
आस नाही हो दिवाळीची....७
जरी व्यथा घोकतेय तुम्हापुढे
जाणते मी, हे बदलणार नाही
सटवीने लिहीलेलं मस्तकावर
काळही पुसून शकणार नाही... ८
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका,
बीड
दि. 9.11.2018
करुणरस
.
धग.. धगधगणारी
अवसेची कुट्ट ती रातही
लख्ख पुनव भासणार आहे
या मनांच्या गाभाऱ्यात मात्र
तोच काळोख असणार आहे.. १
अनंत मंद दीप उजळणारे
विदीर्ण मना हेलावून सोडतात
घोटभर तेलावाचून मात्र इथे
कोरडेच तुकडे पोटात दडतात... २
दारिद्र्याच्या झळा सोशीत
मायेने दिला होता जन्म
धग दुष्काळाची घातकी
झालोत अनाथ आजन्म.....३
मरमर करूनही आमची
आनंदात करी 'ती' दिवाळी
विसरू कशी पदराखाली
झाकत असे फाटकी चोळी...४
नाही नशिबी या फुटक्या
गोडाधोडाचा तो घास
बाहेर पणत्यांची झिलमिल
आत काळोखाचा वास......५
'तो' ही भाकतो करुणा कधी
प्राणज्योती तेवढी तेवत ठेवतो
सुटाबुटातला साहेब बनून
झोळीत काहीतरी टाकत राहतो... ६
माय बनू पाहतेय आता
चिल्यापिल्ल्या भावंडांची
पोट फक्त भाकरी मागतं
आस नाही हो पक्वांनांची....७
जरी व्यथा घोकतेय तुम्हापुढे
जाणते मी, हे बदलणार नाही
सटवीने लिहीलेलं मस्तकावर
काळही पुसून शकणार नाही... ८
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका,
बीड
दि. 5.11.2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा